- २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना लाभ.
- योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट, २०२४.
- महिलांना १,५०० रुपये प्रति महिना; म्हणजेच दरवर्षी १८,००० रुपये मिळणार.
- वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक,
- पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही,
- शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
- विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ.
- योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र/ १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/ जन्मदाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येणार.
- इतर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील
- पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र / १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड/ १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / शाळा सोडल्याचे
- प्रमाणपत्र / जन्मदाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येणार.




या योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी महिला हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक: १८१