Latest Updates

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ #majhi _ladki _bahin #MMLBY

योजनेशी निगडित ताज्या घडामोडी | Mukuamantri Mazi Ladki Bahin Scheme 2024 Latest Updates

01

— वयोमर्यादा

माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरवातीला यात किमान २१ वर्षे ते ६० ही वयोमर्यादा निर्धारित केली होती, पण नंतर त्यात सुधारणा करून वय २१ ते ६५ पर्यंतच्या महिला नावनोंदणी करू शकतात.

02

— उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्कता

शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक..

03

— उत्पन्न प्रमाणपत्र नसल्यास काय?

योजनेसाठी पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

04

— लाभ कोण घेऊ शकते?​

विवाहित ,विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला ह्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. एका कुटुंबातील जास्तीत जास्त २ महिला लाभ घेऊ शकतात.

05

— योजनेचा अर्ज कुठे कुठे भरता येईल​

योजनेचा अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरता येईल. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नारीशक्ती दूत ॲप किंवा पोर्टल ची सोय केली आहे. ऑनलाईन अर्ज भरता येत नसल्यास जवळच्या सेतू सुविधा केंद्रामार्फत भरले जाऊ शकतात.

06

लाईव्ह फोटोची गरज आता नाही​

सुरवातीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ चे अर्ज भरताना लाईव्ह फोटोची गरज होती पण आता ती अट शिथिल करण्यात आली आहे.
ऑफलाईन अर्ज भरला असल्यास फोटोवरून फोटो काढता येईल.

काही महत्वाचे!​

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑगस्ट २०२४
  • योजना कधीपासून लागू होईल – जुलै २०२४
  • पैसे खात्यात कधी जमा होतील – १९ ऑगस्ट २०२४(रक्षाबंधन)
  • किती पैसे जमा होतील – ₹३०००. (दोन महिन्यांचे पैसे एकदमच जमा होतील)
  • अंगणवाडी सेविकांना प्रत्येक फॉर्ममागे बोनस म्हणून ₹५०ची घसघशीत कमाई
  • फॉर्म/अर्जाची किंमत – नाही(०₹)