#MMLBY

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४

माझी_लाडकी_बहीण_योजना पात्रता अर्ज अंतिम तारीख apply online

योजनेबद्दल सविस्तर माहिती

MMLBY ,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ , अर्ज, application form, Pdf, Download , Official website, पात्रता, eligibility,Narishakti Doot App, ₹१५००, 2024

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची” घोषणा केली. Mukhyamantri Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) राज्यभरातील महिलांसाठी अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. या सर्व योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) योजना. या योजनेसाठी गावागावांत, जिल्ह्यात यांसारख्या अनेक ठिकाणी महिलांची झुंबड उडाली आहे.

महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. महिलांना केंद्र स्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरु केली. महिलांना पोषण आहार, रोजगार, कौशल्य यासाठीच्या योजना राबवली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जातील. ही योजना येत्या जुलै २०२४ पासून लागू होईल. या योजनेवर सरकार ४६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे, असे ते म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये अशीच एक योजना चालवली जाते, ज्यामध्ये महिलांना दरमहा १२५० रुपये दिले जातात.

योजनेचे उदिदष्टः

१. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.

२. त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.

३. राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.

४. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे.

५. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

योजनेचे स्वरुप :

प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात DBT द्वारे दरमहा रु.१५००/- इतकी रक्कम दिली जाईल.

योजनेचे लाभार्थी :

महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

पात्रताः | Eligibility criteria

१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.

२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.

४. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

अपात्रता :

१) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

२) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.

३) कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत

४) किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत

मात्र अडीच लाख रुपये उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.

५) लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेतला असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत.

६) कुटूंबातील सदस्यांकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन नसावी.

६) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

आवश्यक बाबीनिकष
वयोमर्यादावय 21 ते 65
पात्रताविवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
वार्षिक उत्पन्न2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी
शिधापत्रिकापिवळी किंवा केशरी
शुभ्र असल्यास, उत्पन्नाचा दाखला आवश्यक
बँक खातेआधार संलग्न असावे
लाईव्ह फोटोगरज नाही, फोटोवरून फोटो काढता येईल
इतर कागदपत्रे15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक
हमीपत्रभरणे आवश्यक
अर्ज करण्याची शेवटची तारीख३१ ऑगस्ट २०२४
योजना कधीपासून लागू होईलजुलै २०२४
पैसे कधीपर्यंत खात्यात वळवण्यात येतील१५ ऑगस्ट २०२४
माझी लाडकी बहीण योजना

#Majhi_ladki_bahin_2024

आवश्यक कागदपत्रे : | Documents

१. आधार कार्ड (अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे)

२. अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.

३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

४. वार्षिक उत्पन्न रु. २५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक,

अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

५. नवविवाहितेच्या बाबतीत रेशनकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

६. बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे)

७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

अर्ज करण्याची पद्धत : | How To Apply Online

योजेनचे अर्ज अर्ज करण्याची प्रक्रियामोबाइल अॅपद्वारे / पोर्टलद्वारे ऑनलाइन भरता येतील.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ( Official Website/ App)

१. पात्र महिलेस नारीशक्ती दूत (NARISHAKTI DOOT) अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज स्वतः भरता येईल. त्याकरिता गूगल प्लेस्टोर वरून नारीशक्ती दूत हे अॅप डाऊनलोड करावे. सदर सुविधा केवळ ANDROID मोबाइल वर उपलब्ध आहे.

२. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

३. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.