ऑफलाईन अर्ज डाउनलोड करा | Download PDF of Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana/Scheme Application Form 2024
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) राज्यभरातील महिलांसाठी अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. या सर्व योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) योजना. या योजनेसाठी गावागावांत, जिल्ह्यात यांसारख्या अनेक ठिकाणी महिलांची झुंबड उडाली आहे.
नव्या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणं सोपं व्हावं यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच आता महिलांना फॉर्म भरताना आता स्वत:चा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेनं व्हावी याबाबत या योजनेच्या अटींमध्ये आता नव्यानं सुधारणा करण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीनं फॉर्म भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. महिला नारीशक्ती, पोर्टल या वेगवेगळ्या माध्यमातून हा अर्ज करू शकतात. याआधी महिलांना अर्ज करताना आपला लाईव्ह फोटो द्यावा लागायचा. पण आता नव्या निर्णयाअंतर्गत तशी गरज भासणार नाही, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
योजनेचा अर्ज करण्यासाठी काय करायचं?
पात्र महिला योजनेसाठी घरी बसूनच ऑनलाईन अर्ज करु शकतात. त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा पीडीएफ अर्ज डाऊनलोड करावा लागणार आहे. त्यात आपलं नाव, पत्ता, बँकेची माहिती, आधार कार्ड नंबर आणि इतर सर्व गोष्टी भरव्या लागणार आहेत. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पुन्हा वेबसाईटवर अपलोड करावा लागणार आहे. बँके खातं नमूद करताना ज्या खात्यात तुम्हाला रक्कम हवी आहे, तेच खातं द्यावं लागणार आहे. त्यात बँकेचं नाव, खातेधारकाचं नाव, बँक खाता क्रमांक, बँकेचा आयएपएससी कोड भरावा लागणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, तुमचं आधार कार्ड त्या बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक असणार आहे.
नोंदणी करणाऱ्या घटकांना प्रति फॉर्म 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूदही या योजनेतंर्गत करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे अंगणवाडी सेविकेची कमाई होणार आहे. त्यांना एका अर्जामागे ५० रुपये मानधन मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची घोषणा केली. या योजनेत नाव नोंदवण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत मुदत आहे. सत्ताधारी आणि विरोधी सर्वच पक्षातील आमदार या योजनेत आपल्या भागातील महिलांची नावे भरुन घेत आहेत. काही आमदारांनी संगणक प्रणालीमार्फत पात्र महिलांच्या याद्या तयार केल्या आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक स्वत: या योजनेवर लक्ष ठेवून आहेत. योजनेला राज्यभरातील महिलांकडून मोठा प्रतिसादही मिळाला आहे.
हमीपत्र डाउनलोड करा | हमीपत्र/Hamipatra Pdf download
नारीशक्ती दूत ॲप( Narishakti Doot Android App). https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
- लाडकी बहीण योजना, ॲपमध्ये कोणकोणती माहिती भरायची? सोप्या टिप्स फॉलो करा, निश्चिंत राहा!
- तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला ॲप डाऊनलोड करायला हवे.
- ॲप डाउनलोड केल्यानंतर अगोदर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे
- ॲपमध्ये नारीशक्तीचा प्रकार : जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतः करावा, किंवा अन्य पर्याय निवडावा
- ॲपमध्ये गेल्यावर सर्वात खाली 4 मेनू दिसतील. त्यापैकी पहिला मेनू नारीशक्ती दूत वर क्लिक करावे.
- क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवर क्लीक करा
- फॉर्म उघडल्यानंतर संपूर्ण माहिती भरून घ्यावी
- माहिती भरताना जन्माचे ठिकाण : ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण, जिल्हा, गाव/शहर, ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरावी.
- त्यानंतर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित माहिती भरावी.
- सर्वात खाली कागदपत्रे अपलोड करताना –
- अधिवास / जन्म प्रमाणपत्र मध्ये TC/जन्म प्रमाणपत्र (शासन निर्णयाच्या सुधारित आदेशानुसार कागदपत्रे)
- उत्पन्न प्रमाणपत्रमध्ये उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड
- हमीपत्र
- बँक पासबुक
- सध्याचा LIVE फोटो
- वरील सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावी.
- त्यानंतर खाली Accept करावे
- माहिती जतन करा वर क्लिक करा
- थोडा वेळ थांबा….तुम्ही टाकलेल्या मोबाईलवर OTP येईल
- 4 अंकी OTP टाका
- फॉर्म सबमिट करा.
- आता तुमचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट झालेला असेल.
- आपण भरलेल्या अर्जाची स्थिती जाणण्यासाठी केलेले अर्ज या टॅबवर क्लीक करा.
- तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती तुम्हाला समजू शकते. त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज Scheme: pending मध्ये दिसेल.
- अशा प्रकारे तुम्ही स्वतःहून तुमचा फॉर्म भरू शकता.